Friday, 24 February 2012

स्टिव्ह जॉब्स कोण होता? सामान्य माणसांना, एवढेच नाही तर ज्यांचा कॉम्प्युटर तंत्रज्ञानाशी संबंध नाही,अशांना या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. मात्र कॉम्प्युटर तंत्रज्ञानाशी ओळख असणा-या प्रत्येकाचा तो आदर्श होता. त्याने स्वप्न पाहिली ती ही अशीच ! त्याच्याशिवाय इतरांनी त्या स्वप्नांवर विश्वास ठेवला नसावा. मात्र आपली सगळी स्वप्न आपल्या हयातीत प्रत्यक्षात उतरवून स्टिव्हने, तो केवळ स्वप्नाळू नाही तर ‘जिनीयस’ असल्याचे दाखवून दिले. मानवी बुद्धी काय-काय चमत्कार घडवू शकते, याचे स्टिव्ह हे जिवंत उदाहरण आहे. एका गॅरेजमध्ये काम करीत -करीत संगणक कंपनी स्थापन करणा-या स्टिव्हने,जगाला अचंबित करणारी उत्पादने समोर आणली.पर्सनल कॉम्प्युटर, संगीत, चित्रपट, मोबाईल फोनमध्ये त्याने अक्षरशः क्रांती घडवून आणली. लॅपटॉप, आयपॅड-पासून ते अ‍ॅपल टिव्हीपर्यंत एकापेक्षा एक सरस अशा ८५ उत्पादनांची निर्मिती त्याने केली. तंत्रज्ञानात क्रांतीकारी बदल करणारी सर्वोत्कृष्ट १० उत्पादने त्याच्याच नावावर आहेत. एकूण ३१७ उत्पादनांचे पेटंट त्याच्या नावावर आहेत. असामान्य बुद्धीमत्ता, अफाट कल्पना-शक्ती व प्रचंड कष्टाच्या जोरावर स्टिव्हने जग बदलण्याचे त्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.
जग बदलवण्याची किमया करणारा हा जादूगर होता कोण? आपल्या रुढ भाषेत सांगायचे तर तो अनौरस बालक होता. आई एका धर्माची,वडील दुस-या धर्माचे.त्याला दत्तक घेतले ते तिस-याने.बालपणात सगळे वाईट अनुभव त्याच्या वाट्याला आले.अनेकदा उपासमार सहन करावी लागली.भूक भागविण्यासाठी मंदिरातील जेवणावळीचा आधार घ्यावा लागला. भणंग मानसिक अस्वस्थेत तो भारतात आला. हिमालयात भटकला आणि पुन्हा अमेरिकेत परतला.त्याचे सुदैव असे की, पाच वर्षाचा असतानाच तो सिलीकॉन व्हॅलीत आला. ही व्हॅली संगणक अभियंत्याचे स्वर्ग होता. इथे बाराव्या वर्षीच त्याला पहिल्यांदा संगणक हाताळण्याची संधी मिळाली. गॅरेजमध्ये काम करीत असतानाच त्याने ‘अ‍ॅपल’ या कंपनीची स्थापना केली. संगणकाच्या प्रारंभिक अवस्थेतच या कंपनीने संगणकाला जोडणारा माऊस उत्पादीत केला. अ‍ॅनिमेशनची सुरुवात केली. त्यानंतर अ‍ॅपलची नवी-नवी उत्पादने येतच राहिली. अ‍ॅपलची सुरुवात करताना पेप्सीकोलाचा व्यवस्थापक जॉन स्कली याला स्टिव्हने अ‍ॅपलमध्ये आणले होते. परंतु पुढे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले.त्याला अ‍ॅपल सोडावी लागली.तेव्हा स्टिव्ह ३० वर्षाचा होता. त्यानंतर स्टिव्हने नेकस्ट कॉम्प्युटर्स कंपनी स्थापन करुन नवी-नवी उत्पादने आणली.काही यशस्वी झाली, काही अयशस्वी. प्रचंड फायदा व प्रचंड तोटा,हे दोन्ही अनुभव तो घेत राहिला. अकरा वर्षे ही कंपनी चालवल्यानंतर, अ‍ॅपलने नेकस्ट विकत घेतली व स्टिव्हला मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बसवले. त्यावेळी अ‍ॅपल अडचणीत होती. मात्र अडचणीवर मात करणे ही तर स्टिव्हची खासीयत होती. अल्पावधीतच अ‍ॅपलला त्याने संकटातून बाहेर काढले.एवढेच नाही तर उत्तूंग स्थानावर पोचवले.
अडचणीतून मार्ग काढत, शून्यातून झेप घेऊन यशस्वी झालेले अनेक उद्योजक असतील परंतु स्टिव्ह जॉब्सशी कोणाचीही तुलना करता येणार नाही. स्टिव्ह सर्वार्थाने वेगळा आहे. कसलीच परंपरा नाही, वारसा नाही, बाप प्राध्यापक,डॉक्टर किंवा पुढारी नाही की कुठल्या विद्यापीठाची डिग्री नाही.कोणाचे पाठबळ नाही की मार्गदर्शन. तरीही अचाट बुद्धी व कल्पना-शक्तीच्या बळावर त्याने जग बदलवण्याचे स्वप्न बघितले व ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. कफल्लक स्टिव्ह अनेक वर्षे श्रीमंत लोकांच्या यादीत प्रथम क्रमांकावर होता. पैसे कमावणे हे त्याचे कधीच ध्येय नव्हते. पैसा त्याच्या मागे धावत आला. संशोधनाचा एखादा टप्पा गाठून तो थांबला नाही. तो सतत नव्याच्या शोधात राहिला. नवं निर्माण करीत गेला.हे त्याचे वेगळेपण इतरत्र ेक्वचितच पहायला मिळते.
सात वर्षांपूर्वी त्याला स्वादूपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. हा कर्करोग दुरुस्त होणारा नव्हता. मृत्यू अटळ होता. मृत्यूच्या धास्तीने,भीतीने माणसं ढेपाळून जातात.असलेलं आयुष्य लवकर संपवतात. मात्र स्टिव्ह असामान्य होता. त्याने सात वर्षे या कर्करोगाशी झुंज दिली.नुसती झुंजच दिली नाही तर या काळात अ‍ॅपलची अनेक उत्पादने बाजारपेठेत आणली.अंतिम श्वासापर्यंत त्याचे हे काम चालू होते.
६ ऑक्टोब्र २०११ रोजी लौकीकार्थाने स्टिव्हने या जगाचा निरोप घेतला असला तरी, जग बदलवण्याच्या अनेक गोष्टी त्याने संशोधित करुन ठेवल्या आहेत. त्याच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी बाजारात आलेला ‘आयफोन ४ एस’ हा ‘व्हाईस रेक्ग्निशन’ तंत्रज्ञान घेऊन आला आहे. पुढची पंधरा-वीस वर्षे तरी जग स्टिव्हच्या संशोधनाभोवतीच फिरत राहणार आहे.त्यामुळेच संपूर्ण जग त्याच्यापुढे नतमस्तक आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामापासून ते सर्वसामान्य तरुणांपर्यंत सर्वांचाच स्टिव्ह लाडका आयकॉन होता.त्याचे हे स्थान दुसरा कोणीही घेऊ शकणार नाही.जगावे कसे व मृत्यूला सामोरे जावे कसे याचा आदर्शच त्याने जगासमोर घालून दिला आहे.
त्याचे जीवनाबाबतचे विचार ख-या अर्थाने प्रेरणादायी आहेत. तो म्हणतो, ‘आपला जीवनकाल मर्यादित असतो. म्हणूनच सतत इतरांचा विचार करुन दुस-याचे जीवन जगण्यात वेळ व्यर्थ घालवू नका. जुलूम, अत्याचाराचे बळी ठरू नका. सतत इतरांबद्दल विचार करीत राहिल्याने,इतरांच्या विचाराने वागत राहिल्याने तुम्ही आपसूक त्याचे बळी ठरत असता. तुमचा स्वतःचा जो आंतरिक आवाज आहे, तुमचा आंतरात्मा जो सांगतो, ते इतरांच्या मनाच्या ओझ्याखाली दडपले जाऊ देऊ नका.तुमचे बहुतांश जीवन तुमच्या कार्याने भरलेले असावे.तुम्हाला जे चांगले आणि उदात्त वाटते, ते करणे यातच खरे समाधान आहे. थोर कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे काम करता ते मनापासून आणि निष्ठापूर्वक करा. तुम्हाला अद्याप गवसले नसेल तर शोध सुरु ठेवा. गवसले की, कार्य कसे करायचे ते तुम्हाला आपोआप कळेल

Wednesday, 15 February 2012

कैसे करें हिस्ट्री में बेहतरीन प्रदर्शन

इतिहास को आमतौर से छात्र बहुत ही बोरिंग और ऊबाऊ विषय के रूप लेते हैं और रट्टा मारने को ही इसमें पास होने का एकमात्र विकल्प मानते हैं। पर यह आजमाई हुई बात है कि इस तरह से इतिहास की पढ़ाई करने से कभी अच्छे मार्क्स नहीं आते हैं। हालांकि सबसे दिलचस्प पहलू यह भी है कि अगर इतिहास को थोड़ा ध्यानपूर्वक पढ़ा जाए तो यह विषय किसी कहानी या उपन्यास की भांति लगने लगता है।
एनसीईआरटी की टेक्स्ट बुक्स से संबंधित टॉपिक्स पर और सामग्री जुटाकर तैयारी करने का प्रयास भी साथ-साथ किया जा सकता है। इसमें अब तो इंटरनेट का सहारा सबसे सुलभ है। आइए बात करें कि अमूमन छात्र इस विषय की तैयारी और उत्तर लेखन में किस तरह की गलतियां करते हैं और इसमें सुधार के क्या संभव तरीके हैं।

आम गलतियां
1. इतिहास की टेक्स्ट बुक को बिलकुल नहीं पढ़ने की प्रवृत्ति और गाइड्स/हेल्प बुक पर पूर्ण निर्भरता।

2. बिना नोट्स तैयार किए इतिहास की तैयारी।

3. परीक्षा के दौरान लंबे उत्तर दिखाने के लिए जगह छोड़कर लिखा और उत्तर पुस्तिका भरना।

4. ज्यादा लिखने के क्रम में बार-बार कुछ ही बातों को रिपीट करना और बेवजह की बातें लिखना।

सुधारने के टिप्स
1. सबसे पहले तो अपने दिमाग से यह बात बिलकुल निकाल दें कि इतिहास रटने का विषय है। ध्यानपूर्वक पढ़ने पर इसमें दिलचस्पी जगनी स्वाभाविक है। बशर्ते कि ऐसा प्रयास किया जाए।

2. परीक्षा से पहले के इस अंतिम समय में टेक्स्ट बुक्स पढ़ते समय बेशक मुख्य बिंदुओं पर निशान लगाते चले जाएं अथवा समय हो तो बिंदुवार क्रम में मुख्य प्वाइंट्स को लिखते रहें। इससे परीक्षा से पहले रिवाइज करने में न सिर्फ समय की बचत होगी बल्कि काफी बातें याद भी आसानी से होती चली जाएंगी।

3. हमेशा प्रश्न के मान के अनुसार बिंदुवार तरीके से उत्तर लिखने की आदत डालें। हर अंक के अनुसार कम से कम एक बिंदु तो अवश्य ही होना चाहिए। अगर इन बिंदुओं का अधिक से अधिक 15 से 20 शब्दों की शब्द सीमा में विवरण भी देने की कोशिश करें तो सोने पर सुहागा।

4. इतिहासकारों के नाम, उनके विचार और कृतियों का उल्लेख करने से परीक्षक पर काफी अच्छा इंप्रेशन पड़ता है। इसका अतिरिक्त लाभ यह भी होता है कि वह छोटी-मोटी गलतियों को नजरअंदाज कर अच्छे अंक देने का प्रयास करता है।

5. इंटरनेट के जरिए आपको टेक्स्ट बुक के अलावा संबंधित टॉपिक पर कुछ नए विवरण भी हासिल हो सकते हैं। इससे आपके उत्तर अन्य छात्रों से ना सिर्फ अलग बल्कि बेहतर भी लगेंगे। इसका फायदा भी आपको थोड़े बहुत ज्यादा अंकों के रूप में मिल सकता है।

6. इतिहास को क्रोनोलोजिकल ऑर्डर में पढ़ने और समझने का प्रयास करेंगे तो विषय जल्दी और आसानी से समझ में आयेंगे। संभव हो तो एक सरल सा चार्ट भी बना सकते हैं।

7. सीबीएससी के सैम्पल पेपर्स के अलावा गत वर्षों के पेपर्स की जितनी प्रैक्टिस करेंगे उतना ही आपका हौसला बढ़ता चला जाएगा। लेकिन इसमें ईमानदारी बरतते हुए अपनी कमियों को जानेंगे तभी अपेक्षित नतीजे संभव हैं।

8. उत्तर पुस्तिका में बेवजह पेज भरने की प्रवृत्ति का सबसे खराब इंप्रेशन पड़ता है। ऐसा करने से नुकसान होने के चांस ज्यादा हो सकते हैं। इसलिए इस बात की कतई परवाह नहीं करें कि आपने कितनी अधिक संख्या में एक्स्ट्रा शीट्स ली हैं। हां यह अवश्य है कि जितना भी उत्तर पता है उसे बेहतरीन तरीके से प्रस्तुत करें।

9. यह बताने की जरूरत नहीं है कि कम से कम एक मिनट का समय अपनी उत्तर पुस्तिका को ध्यानपूर्वक पढ़ने के लिए अंत में अवश्य रखें।

10. क्लास में टीचर द्वारा बताए गए इंपोर्टेंट प्रश्नों और टॉपिक्स को हर हाल में ठीक से तैयार करना न भूलें। मान कर चलें कि इसमें काफी कुछ आपको बोर्ड के पेपर में देखने को मिल सकता है।
                                                                                                             Mr. N.D.Surwade