Sunday, 5 May 2013



                      ई-लर्निंग अभ्यासक्रम

जगभर आता इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ लागले आहेत. यासाठी नवीन अध्ययन-अध्यापन पद्धती आणि त्यासंबंधीचे संशोधन पुढे ये
लागले आहे. शिक्षणशास्त्र आणि तंत्रविज्ञान यांची अचूक सांगड घालण्याचे काम शैक्षणिक तंत्रविज्ञान म्हणजेच Education Technology हे क्षेत्र करते. अनेक देशांमध्ये विद्यापीठीय स्तरावर एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विषयामध्ये संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. विद्यापीठ स्तरावर या प्रकारचा अभ्यासक्रम देणारं एकमेव विद्यापीठ आहे ते एसएनडीटी. एसएनडीटीच्या जुहूतील कॅम्पसमध्ये एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विभागातफेर् दिली जाणारी MET-CA ही मास्टर्स पदवी याच विषयातील आहे.

मास्टर्स इन एज्युकेशनल टेक्नॉलॉजी-कॉम्प्युटर अप्लिकेशन्स MET-CA हा पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहे. ऑनलाइन लर्निंग, मल्टिमिडिया इन एज्युकेशन या विषयांसाठी लागणारी सर्व कौशल्ये या अभ्यासक्रमातून शिकवली जातात. एखादा अभ्यासक्रम -लर्निंगद्वारे कसा शिकवायचा हे या अभ्यासक्रमातून शिकवलं जातं. विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, प्रौढांना शिकवण्याची तंत्रं, आशय मांडण्याची तंत्रं, अध्ययनाच्या विविध पद्धती, स्वाध्याय तयार करण्याची तंत्र, संगणकासाठी स्क्रीन डिझाइन, दूरस्थ शिक्षण, मुक्त शिक्षणसाहित्य, ग्राफिक्स आणि अॅनिमेशनचे नियोजन, इन्स्ट्रक्शनल डिझाइनच्या पद्धती आणि तंत्रं, अध्यापनाची इंटरनेटवर उपलब्ध असलेली साधनं, वेबडिझाइनची कौशल्यं, वेबसाइटचा अभ्यास आणि निमिर्ती प्लॅश, ड्रीमवेव्हररखी सॉफ्टवेअर्स आदी अनेक विषय दोन वर्षांच्या कालावधीत हाताळले जातात. पदवी अभ्यासक्रमाची माहिती आणि अर्ज www.det.sndt.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. संपर्क : २६६०२८३१.

Note: kahi adchan aslas 8975008429 ya nomber war call karu sakta.