जीवन प्रवासातील यश मोजत असताना त्यात RICH होणं महत्वाचं आहेच. पण मग RICH कुणाला म्हणायचं?
अमाप पैसा गाठीशी असेल तर त्याला RICH म्हणायचं?
केवळ अमाप पैसा हे जर यशाचं रहस्य असतं तर सर्व पैसेवाले आनंदानंच जगले असते, पण प्रत्यक्षात मात्र तसं दिसत नाही कारण आनंदाची अनुभूती पैशाने खरेदी केलेल्या मोठमोठ्या गोष्टीतच असते असं नाही तर खूपदा ती भावनिक आपुलकीतून आणि निरपेक्ष प्रेमातून साकारलेल्या छोट्या छोट्या गोष्टीत असते.
सत्ताधारी व्यक्तींना RICH म्हणायचं?
सत्ता जर यशाचं रहस्य असतं तर सत्ताधारी व्यक्तीला सुरक्षेची खात्री मिळाली असती. नेते संरक्षकांशिवाय निर्भयपणे उघड उघड वावरू शकले असते. पण प्रत्यक्षात ते सगळे सतत भीतीने ग्रस्त असतात आणि असुरक्षिततेच्या तणावाखाली जगतात. याउलट जे सामान्यातले सामान्य असतात, जे साधी राहणी अवलंबतात ते निर्धास्तपणे जगतात. त्यांना रात्री मस्त शांत झोप लागते.
सुंदर आणि सुप्रसिद्ध असलेल्याला
ला RICH म्हणायचं?
सौंदर्य आणि प्रसिद्धी या दोन गोष्टी जर यशस्वी जीवनाचा पाया असत्या तर सर्व सेलिब्रिटीजचे वैवाहिक सहजीवन समाजात आदर्श मानले गेले असते. पण प्रत्यक्षात बहुतेक सेलिब्रिटीजच्या वैवाहिक जीवनाची वाताहात झालेली पहायला मिळते. याउलट सामान्यातली सामान्य जोडपी आपल्या छोट्याशा घरातही वैवाहिक सहजीवनाचा आनंद मनमुराद लुटत समाधानानं जगताना दिसतात.
या क्षणभंगुर आयुष्यात जरा अंतर्मुख होऊन RICH शब्दाचा खरा अर्थ जाणून घेणं गरजेचं आहे.
RICH शब्दामधला
'R' हा Relationship चा,
'I' हा Income चा,
'C' हा Character चा आणि 'H' हा Health चा.
‘नातेसंबंध’, ‘पैसा’, ‘चारित्र्य’ आणि ‘आरोग्य’ हे चारही स्तंभ मजबूत आणि संतुलित असणं म्हणजे RICH असणं. यातला एक स्तंभ जरी डळमळीत असेल किंवा मजबूत असूनही संतुलित नसेल तरी बाकी सारं असूनही आयुष्य विकलांग आहे.
चला...
एकमेकाना wish करू या आणि सगळेच जण RICH होऊ या...!