Saturday, 28 July 2012

INFORMATION OF RASIYA EDUCATION

सध्याची तरूणाई कारकिर्दीबाबत अधिकाधिक सजग होत आहे. बहुतांश तरूण-तरूणी केवळ पदवी घेऊन नोकरीला लागण्यापेक्षा उच्च शिक्षण घेणे पसंत करतात. त्यातही शिक्षणासाठी परदेशात जाण्याची क्रेझ वाढत आहे. आजकाल बर्‍याच सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने परदेशात जाणे तितकेसे अवघड राहिलेले नाही. मात्र, चांगले शिक्षण घ्यायचे म्हटले की चांगले गुण आवश्यक असतात. कारण, गुण चांगले असतील तर चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळणे शक्य होते. मात्र, आता कमी गुण मिळूनही पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणे शक्य आहे. विशेषत: रशियामध्ये यासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. रशियाने आपल्या विद्यापीठां ध्ये प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश देण्याची सोय केली आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रात रशियाचं ज्ञान अनेक पटींनी पुढे आहे. अनेक विकसनशील देशांध्ये त्यांनी आपल्या इंजिनिअरिंग क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून मोठमोठी विकासकामं केली आहेत.
रशियासारखा देश विकसित असल्यामुळे विकसनशील देशां ध्ये विकासकामं करण्यासाठी आपले तंत्रज्ञ पाठवण्याचा त्यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. भारतातील अनेक विकास योजनांध्येही त्यांचा सहभाग दिसून येतो. सध्या रशियाचं क्रायोजेनिक इंजिन, क्षेपणास्त्रं आणि उपग्रह यंाची जगातील श्रेष्ठ तंत्रज्ञात गणना केली जाते. केवळ याच क्षेत्रात नाही तर इंजिनिअरिंग क्षेत्रातही रशियातील विश्‍वविद्यालयात बर्‍याच संधी उपलब्ध आहेत. रशियातील शिक्षणसंस्थां ध्ये उपलब्ध सुविधा, तिथे देण्यात येणारं ज्ञान आणि विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार्‍या सवलती याविषयी बरीच चांगली मतं व्यक्त केली जातात. युनेस्कोने दिलेल्या गुणवत्ता क्रमांकानुसार रशियातील विद्यापीठांचा समावेश जगातील सर्वश्रेष्ठ तीस विद्यापीठां ध्ये केला जातो. इथे प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत असल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यां ध्ये नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची अधिक क्षमता निर्माण होतेय. याशिवाय या विद्यापीठातील शिक्षणाला जागतिक स्तरावरही मान्यता प्राप्त झाली आहे. प्रवेशासाठी पात्रता आणि खर्च या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी बारावी मध्ये कमीत कमी ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यात गणित, भौतिक आणि रसायन या विषयांचा समावेश अपरिहार्य आहे. ही झाली पदवी परीक्षेची पात्रता. ज्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आपल्याला मिळालेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत प्रवेश मिळवण्यासाठी जोडणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता पडताळून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. पदवी परीक्षेचा अभ्यास चार वर्षांसाठी तर प द व् य ु त्त् ा र अभ्यासक्रमासाठी दोन वर्षांचा कालावधी दिला आहे. हे दोनच प्रकारचे अभ्यासक्रम इथे उपलब्ध करून दिले जातात. या विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण किंवा पदवीसाठी सुारे दीड लाख रुपयांचा खर्च अ प े ि क्ष त अ स त ा े . क  ा ह ी विद्यापीठां ध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम उपलब्ध आहे. परंतु बहुतेक ठिकाणी रशियन भाषेत शिकावे लागते. त्यामुळे रशियन भाषा शिकणे अनिवार्य मानले जाते. जे विद्यार्थी ङ्गॉरेन लँग्वेज म्हणून रशियन भाषा निवडतात त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी म्हणायला हवी. मात्र जे विद्यार्थी इंग्रजी माध्यम घेतात त्यांच्यासाठी काही अडचण येत नाही. विद्यार्थ्यांसाठी सुविधा विद्यार्थांना व्हिसा मिळविण्यासाठी आणि प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती तपासून घेण्यासाठी या विद्यापीठांच्या रशियन भाषा संस्थेतर्ङ्गे व्हिसा विभागात खास सोय करण्यात आली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याला रशियात राहण्यात आणि रोजच्या व्यवहारात अडचणी येऊ नयेत म्हणून या विभागातर्ङ्गे त्यांना जुजबी रशियन भाषा शिकवण्याची सोय करण्यात येते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची रशियात पोहोचून राहण्याची, जेवणा-खाण्याची तरतूद होईपर्यंत ही संस्था मार्गदर्शन करते. मात्र या संस्थेच्या काही नियम आणि अटीही आहेत. त्यांचे भान ठेवायला हवे. वेळेवर ङ्गी जमा न करणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाते. त्यांचे नामांकनही रद्द केले जाते. विद्यार्थ्याने एखादा गुन्हा केला तर त्याला काढून टाकण्याचा अधिकार त्यांना असतो. होस्टेलमध्ये राहण्याचे नियम कडक आहेत. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना विद्यार्थ्याला भेटण्यासाठी व्हिसा मिळवून देण्यासाठी ही संस्था मदत करते. अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय, खेळ, मनोरंजन आदी सुविधा पुरवल्या जातात. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे परराष्ट्र मंत्रालयाने किंवा मानव संसाधन मंत्रालयाद्वारे प्रमाणित केलेली दहावी आणि बारावीची प्रमाणपत्रे, नोटरीकडून प्रमाणित केलेला जन्मतारखेचा दाखला, मेडिकल प्रमाणपत्र (ज्यात एच. आय. व्ही. टेस्ट देखील असते) यांचा समावेश असतो. पासपोर्टची एक साक्षांकित प्रत, ५ बाय ४ आकाराचे बारा ङ्गोटो , पूर्ण भरलेले प्रवेशपत्र आदी कागदपत्रे पूर्ण करावी लागतात. विद्यार्थी खालील ि व द्य ा प ी ठ  ा ं म ध् य े अभ्यासक्रमाची चौकशी करू शकतात. मॉस्को एविएशन इनिस्टट्यूट, मॉस्को स्टेट ऑटो ोबाईल एंड रोड इन्स्टिट्यूट, मॉस्को इंटरनॅशनल बिजनेस हायस्कूल, सेंट पीट्सबर्ग युनिव्हर्सिटी ङ्गॉर सिव्हिल एविएशन नॉर्थ काऊकैसस स्टेट टेक्निकल युनिव्हर्सिटी स्वारोपॉल किंवा टैगनरॉग स्टेट युनिव्हर्सिटी ऑङ्ग र े ि ड  अ ा े इंजिनिअरिंग आदी संस्थां ध्ये विद्यार्थी चौकशी करू शकतात. अधिक माहितीसाठी रशियन भाषा संस्थान, रूम नं ३०४, ङ्गिरोजशाह रोड, नवी दिल्ली-११०००३ या पत्त्यावर संपर्क साधू शकता. तेथील दूरध्वनी क्रमांक (०११) ३३२९२१७ असा आहे.

No comments:

Post a Comment